कोथरुड

भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन व पूजन करून कोथरूडमध्ये संविधान दीन साजरा..

कोथरुड : कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौकात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त चौकात उभा करण्यात आलेल्या संविधान द्देशिकेच्या प्रतिमेचे वाचन व पूजन करण्यात आले. तसेच संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

आरपीआय (अ)+७चे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भापाचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन संविधान उद्देशिकेचे पूजन केले केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय डाकले यांनी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करून घतले.

Img 20230803 wa0004281298499086669704171738

कोथरूड कर्वेनगर परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहत संविधान उद्देशिकेचे पूजन केले. यावेळी आकर्षक सजावट करून संविधान उद्देशिकेची प्रतिमा उभा करण्यात आली होती. तर त्यासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. संध्याकाळी याठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात आला तसेच संविधान सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली.

Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये