काय आहे कोक्सीडिनिया आजार..सांगताही येईना आणि सहनही होईना

कोक्सीडिनिया नाव ऐकताच काही तरी भयंकर आजार आहे की काय असे नक्की वाटले असणार. कोक्सीडिनिया म्हणजे टेल बोनचा आजार, Disease of tail bone माकड हाडाचा आजार. बऱ्याच जणांना हे हाड दुखण्याचा आजार असतो. कोणाला लगेच सांगता येत नाही आणि सहन पण होत नाही अशी अवस्था हा आजार झाल्यावर रुग्णाची होते. काही जण लज्जा पोटी आजार लपवतात पण आजार लपवणे म्हणजेच आजार वाढवणे हे मात्र नक्की
कोक्सीडिनिया होण्याची कारणे
सतत एका जागी बसून काम करणे,
सतत दोन चाकी वाहन चालवणे,
वाहन चालवताना गाडी खड्डा मधून जाणे आणि टेल बोन ला इजा होणे,
महिला वर्गात डिलीवरी दरम्यान ह्या हाडाला इजा होणे,
वजन जास्त प्रमाणात वाढणे,
मधुमेह , थायरॉइड चा आजार,
मानसिक ताणतणाव आसणे,
सतत नकारात्मक विचार करणे,
टाइप A पर्सनालिटी च्या लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो आणि तो लवकर बरा होत नाही.

लक्षणे
माकड हाड ला सतत दुखत राहणे, जास्त वेळ एका जागेवर बसता न येणे, हार्ड सरफेस वर बसले की माकड हाड नितंब दुखत राहणे, लैंगिक संबध ठेवताना वेदना होणे, संडास करताना वेदना होणे, गाडी चालवताना वेदना होणे.
निदान
साधारणपणे पेशंट च्या बोलण्यावरून तपासणी केल्यावर आजाराचे प्राथमिक निदान होते.
गरजे प्रमाणे एक्सरे काढून आजाराचे निदान करता येते.
५०% पेशेंट मधे एक्सरे नॉर्मल असतात.
काही पेशेंट मध्ये एक्सरे मद्दे हाडाला थोडा बाक आलेला दिसतो.
उपचार
मेडिसिन काही ठरावीक व्यायाम
कडक जागेवर बसणे टाळणे आवश्यक आहे.
डॉक्टर यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
डॉ. सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ






