
बैलजोडी, गाय-वासरु आणि आता पंजा ही चिन्ह काँग्रेस पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत बदलत राहिली. १९७८साली हाताचा पंजा हे चिन्ह इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला मिळाले. निवडणूक आयोगाने पंजा हे चिन्ह काँग्रेसला दिले आणि त्याचवेळी १९७८ साली पुणे महापालिकेची पोटनिवडणूक झाली.
जनता पक्षाचे नेते भाई वैद्य यांचा राज्य मंत्रीमंडळात गृहराज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्यावेळी त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या वॉर्डांत पोटनिवडणूक घेण्यात आली. तेव्हा जनता पक्षाने भाई वैद्य यांचे निकटवर्तीय रविंद्र शिंदे यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेस आय पक्षाने प्रकाश ढेरे यांना उमेदवारी दिली आणि ढेरे यांना पंजा चिन्ह मिळालं.
या निवडणुकीत ढेरे निवडून आले. ढेरे हे पंजा चिन्हावर निवडून आलेले देशातले पहिले उमेदवार ठरले. त्यानंतर काही महिन्यांनी कर्नाटकमधील चिकमगळूर लोकसभा मतदारसंघातून पंजा चिन्हावर इंदिरा गांधी यांनी पोटनिवडणूक लढविली. त्या निवडून आल्या.

नगरसेवक झाल्यानंतर प्रकाश ढेरे भवानी विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल राज्यमंत्री होते. पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्षे भूषविले. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे ते विश्वासू सहकारी होते.
कालांतराने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंजा चिन्हावर निवडून आलेल्या पहिल्या उमेदवाराचे पक्षांतर त्यावेळी चर्चिले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रदेश पातळीवरील पदे भूषविली. पक्ष संघटनेत सर्व कार्यकर्त्यांना ओळखणारे आणि शहराच्या राजकारणाचे बारकावे जाणणारे असा ढेरे यांचा परिचय होता.
राजेंद्र पंढरपुरे (जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला. https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/

सिंहासन NEWS- ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से.
सिंहासन NEWS- ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से.
One Comment