निवडणूक प्रचाराच्या दरम्यान खूप किस्से घडतात, नमुनेदार माणसं भेटतात. त्या प्रसंगांना उमेदवारांना सामोरे जावे लागते. लोकसभेच्या एका निवडणुकीतील हा प्रसंग आहे. उमेदवाराची पदयात्रा एका अरुंद रस्त्यावरुन चालली होती. तेव्हा एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून एका पन्नाशीच्या गृहस्थाने डोकं बाहेर काढून त्या उमेदवाराचे नाव घेऊन जोरजोरात हाका मारल्या.
उमेदवारानेही त्याला प्रतिसाद देत सांगितले, गड्या, लक्षात ठेव ‘कमळ, कमळ’. त्यावेळी तो गृहस्थ म्हणाला, लक्षात आहे तुमचं कमळ. पण, तुम्हीही लक्षात ठेवा, २४ मतं आहेत माझ्या घरात. असं सांगून त्याने सूचक हातवारे केले. हा गृहस्थ मतांचा सौदा करतो आहे ते उमेदवाराने चटकन ओळखलं आणि मान फिरवून पदयात्रा चालू ठेवली.
बरोबरच्या चाणाक्ष नेत्यांनी उमेदवाराचे प्रसंगावधान ओळखले. पदयात्रा संपली तेव्हा चहा पिता-पिता या प्रसंगावरच गप्पा रंगल्या. गप्पांमध्ये ते उमेदवारही सामील झाले. रणरणत्या उन्हात हास्याचा शिडकावा उडाल्याने सगळ्यांना जरा बरे वाटले.ऐन प्रचारात उमेदवाराला कशाकशाला सामोरे जावे लागेल, याचा अंदाज येत नाही एवढे मात्र खरे.
राजेंद्र पंढरपुरे.
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय निरीक्षक.
सिंहासन NEWS- एका क्षणात निर्णय अन् कोथरुडच्या कचरा डेपोचा प्रश्न निकाली.. https://www.sinhasannews.com/in-a-moment-the-decision-solved-the-question-of-the-garbage-depot-of-kothrud-9186/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– ‘पंजा’ चिन्हावर देशात पहिला विजय मिळविणारे प्रकाश ढेरे https://www.sinhasannews.com/prakash-dhere-who-won-the-first-victory-in-the-country-on-the-paw-symbol-8957/
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/