पुणे शहर

वारजे माळवाडीत मुलीशी मैत्रीसंबंध न तोडल्याने युवकाचा खून

पुणे : वारजे माळेवाडीत (Warje Malwadi) धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रीसंबंध तोडून टाकण्यास नकार दिल्यानं एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

मुलीशी मैत्रीसंबंध तोडून न टाकल्याने एका युवकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शिवणे भागात घडली आहे. प्रद्युन्य प्रकाश कांबळे (वय 22, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत एका महिलेसह चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी अजय विजय पायगुडे (वय 19), विजय किसन पायगुडे (वय 50), एक महिला (सर्व रा. साईश्रद्धा रेसीडन्सी, दांगट पाटीलनगर, शिवणे), सागर गोविंद राठोड (वय 21, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर काॅलनी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मयत कांबळे हा तक्रारदार मुलाचा आतेभाऊ होता. त्याचे आरोपी पायगुडे यांच्या नात्यातील एका मुलीशी मैत्रीसंबंध होते. मैत्रीसंबंध तोडून टाकण्यासाठी पायगुडे कांबळेवर दबाब टाकत होते. तिला त्रास देऊ नको, असे आरोपींनी त्याला सांगितले. दोन दिवसांपूर्वी रात्री कांबळे शिवणे परिसरात गेला होता. त्या वेळी आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. सिमेंटचा गट्टू आणि गजाने बेदम मारहाण केली. त्यात कांबळेचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक आर. एन. पार्वे याचा तपास करत आहेत.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये