पुणे शहरातील निर्बंध शिथिल ; सोमवारपासून सर्व दुकाने सुरु, जिम, हॉटेल ५०% क्षमतेने, नवीन वेळा घ्या जाणून

पुणे : Pune city lock down पुणे शहरासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तिसऱ्या टप्प्यातील नियमावली लागू करण्यात येत असून त्यानुसार पुणे महापालिका आयुक्तांनी नवीन आदेश जारी केले केले असून या आदेशानुसार शहरातील निर्बंध सोमवार दिनांक ७ जून पासून शिथिल करण्यात येत आहेत. Restrictions in Pune city relaxed; All shops open from Monday, gym, hotel with 50% capacity, learn new times
या आदेशानुसार शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू ठेवता येणार असून शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

शहरातील हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार असून शनिवार व रविवारी फक्त पार्सल सेवा सुरू ठेवता येणार आहे. खाजगी कार्यालय सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार असून सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असणार आहे.
पीएमपीएल बस सेवा ही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार नाट्यगृह व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात येणार असून सोमवार दिनांक 7 जून पासून या सुधारित नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे शहरातील शाळा आणि 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत.
हे सुरू होणार
खासगी कार्यालय सोमवार ते शनिवार दुपारी चारपर्यंत 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहणार
हॉटेल रेस्टॉरंट दुपारी चार पर्यंत 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार व शनिवार रविवारी फक्त पार्सल सेवा
ब्युटी पार्लर सलून जिम 50% क्षमतेने नियोजित वेळेनुसार सुरू ठेवता येणार .
बस सेवा 50% क्षमतेने सुरू राहणार केवळ बसून
पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी मैदाने सुरू राहणार
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने करता येणार
सायंकाळी 5 नंतर शहरात संपूर्ण संचारबंदी
सोमवारपासून पुणे शहरासाठी नवीन नियमावली
:- सोमवारपासून शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील
:- महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील
:- सामाजिक धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी
:- लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीतीला परवानगी
:- व्यायाम शाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील
:- पी एम पी एम एल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
:- आंतरजिल्हा बंदी उठवण्यात आली आहे



