पुणे शहर

पुण्यात दिवसभरात १,१०४ रुग्ण कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

पुणे : शहरात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एका दिवसात दुपटीहून अधिक वाढली असून १ हजार १०४ नवे कोरोना संक्रमित रुग्ण महापालिकेच्या दैनंदिन अहवालात नोंदविण्यात आले आहेत.

शहरातील रुग्णांची संख्या एका दिवसात दुपटीने वाढल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. दि. ३ जानेवारी रोजी ४४४ दैनंदिन रुग्ण नोंदविले गेले होते. ४ तारखेला ही संख्या दुप्पट झाली आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची स़ख्या ३ हजार ७९० पर्यंत जावून पोहोचली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून १५१ पूर्ण बरे झाले आहेत, असे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे. तसेच, दिवसभरात ६ हजार८१९ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये