पुण्याची एकता दाखवत ‘पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉन’मध्ये धावले २१ हजार पुणेकर ; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवातील मॅरेथॉनमध्ये पुणेकरांनी दिला एकतेचा संदेश

मनीष राजपूत आणि अंकिता गावित ठरले विजेते..
पुणे : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत आज संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने फोर्स मोटर्स ‘पुणे रन फॉर युनिटी’ या महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याला पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पुण्याच्या एकतेचा संदेश दिला. ४ गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये २१ हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभाग नोंदवला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते . या मॅरेथॉन स्पर्धेत मनीष राजपूत आणि अंकिता गावित विजेते ठरले

या वेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, ॲड. एस.के. जैन, क्रिकेटपटू केदार जाधव, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष मकरंद कानडे, कॅप्टन अभिनील राय, विमानतळ संचालक संतोष ढोके, सीआयएसएफचे प्रताप पुंडे, राकेश मारू, प्रवीण कर्नावत, श्री. ऋषी लुहारूका, सुशील जाधव,इंद्रनील चितळे, अमूलचे प्रदीप जाधव,अमय शिरोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन;40 हजार खेळाडू सहभागी होणार..



मुरलीधर मोहोळ म्हणाले, नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा हा उपक्रम मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरला आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात ‘रन फॉर युनिटी’ (राष्ट्रीय एकता दौड) या उपक्रमाचे आयोजन केले जाते.खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले असून आज पासून पुढील पंधरा दिवस पुण्यात 40 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. विविध 37 प्रकारचे खेळामध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत.या महोत्सवास आज मॅरेथॉन स्पर्धेने सुरूवात झाली आहे.



यावर्षी पहिल्यांदाच पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजन केले गेले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे २१,००० हून अधिक धावपटू सहभागी झाले. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंनी सहभागी होत पारितोषिके पटकावली.
२१ किमी विजेत्या धावपटूंची नावे…
भारतीय धावपटू (खुला गट)
मनीष रजपूत (१:०५:०२)
हरीश शेवरान (१:०५:१५)
मनोज कुमार (१:०५:३१)
भारतीय धावपटू (महिला)
अंकिता गावित (१:१७:४५)
तामसी सिंग (१:१९:१७)
रविना गायकवाड (१:२१:२७)
२१ किमी आंतरराष्ट्रीय धावपटू (खुला गट)
मिशेल कायलो मैथ्या (१:०७:११)
पॉल केमी ( १:०७:२४)
मीशेक बुगुआ (१:०८:३३)
आंतरराष्ट्रीय धावपटू (महिला गट)
कीप्टू कॅरोलिन (१:२०:२६)
पेनीनाह वैथिरा (१:२३:०९)
देसी किटीला (१:३१:३३)



