महाराष्ट्र
महिलांना एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट ५० टक्के सूट

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांना आता एसटी प्रवासांत ५० टक्के सूट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली आहे.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज या नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी राज्य सरकारने महिलावर्गाला विशेष लक्ष्य करत काही घोषणा केल्या आहेत. तर, लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता ५० टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे.




