महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्थेचा ७५ वा वर्धापनदिन पुण्यात उत्साहात…

वर्धापनदिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन
पुणे : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्थेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे जिल्हा शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ट्रस्टचे विश्वस्त व माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. 75th Anniversary of Maharashtrian Yadav Charity Trust Shikhar Sanstha celebrated in Pune
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व चहापान कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टचे विश्वस्त व माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या उपस्थितीत व पुणे जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली उद्यानप्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, येथे करण्यात आले होते. यावेळी उत्साही वातावरणात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ८-१० महिन्यांच्या कालावधीत मृत पावलेल्या सभासद व न्याती बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाबा धुमाळ सुरेश कासार, दत्ताराम महाडीक, अस्मिता दिवेकर यांनी ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी शाखा कार्यकारिणी पदाधिकारी/सदस्य, विभाग पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते. ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सभासदांकरीता आयुष्यमान भारत योजनेविषयी माहिती तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता दाखला, तसेच शैक्षणिक व वैद्यकीय कामासाठी आवश्यक शासकीय दाखले मिळविण्याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल असे ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप धुमाळ यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दिघे व आभार डॉ. अभिजित महाडीक यांनी मानले.



