पुणे शहर

शिवजयंतीला परवानगी नाही. पण दुकानाच्या उदघाटनाला ढोल-ताशाचा गजर ; महापौरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

शिवसेना-मनसेची कारवाईची मागणी

पुणे : कर्वे रस्त्यावरील दागिन्यांच्या दुकानापासून हाकेच्या अंतरावर कोथरूड छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक आहे. आज शिवजयंती असतानाही कोरोना काळामुळे शिवजयंती उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सवाला ढोल वाजवण्याची परवानगी देण्यात आली नाही. सर्वपक्षीय केवळ चार जणांना महाराजांना पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी मिळाली. मात्र दुकानाच्या उदघाटनाला ढोल- ताशाचा गजर महापौरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर पोलिस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याची शिवसेना, मनसेने मागणी केली आहे.Shiva Jayanti is not allowed. But the drum-beating alarm at the opening of the shop; The fuss of social discrimination in the presence of the mayor   

याबाबतीत मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे आणि शिवसेनेचे जयदीप पडवळ यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. धावडे म्हणाले,पोलिसांना विचारले असता सदर कार्यक्रमास कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही असेच समजले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन व पोलीस प्रश्नाने समबंधीत व्यावसायिकांवर त्वरित कारवाई करावी ही मागणी करण्यात येत आहे.

कर्वे पुतळा चौक कोथरूड येथे महापौर मुरलीधर मोहोळ व भाजपचे लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार यांच्या उपस्थितीत एका दागिन्यांच्या दुकानाचे आज उदघाटन होत आहे. एकीकडे महापौर कोरोना विषयी जनजागृती करत आहेत.आणि आज शेकडोंच्या उपस्थितीत महापौरां समोर ढोलताशांचे पथक लावत उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षिततेचे कुठलेही पालन होताना इथे दिसले नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी या विषयात अलंकार पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हा दाखल करण्याची विंनती केली आहे.

Img 20210219 wa0008

वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय अधिकारी संतोष वारुळे म्हणाले, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग बाबतींत तक्रार आल्यानंतर कारवाई साठी दोन पथक पाठविण्यात आले आहे.

पडवळ म्हणाले, या प्रकारानंतर पोलिस आणि महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.

Img 20210219 wa0013

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये