पुणे शहर
पाषाणमधील सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन

पुणे : पाषाण येथे सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शस्त्र गाथा इतिहासाची ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
समाज भूषण शांताराम महाराज निम्हण व एडवोकेट मारुती गोळे यांच्या हस्ते शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ऐतिहासिक अशा तलवारी, कट्यार, बंदुका, भाले अशा विविध शस्त्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी व नागरिक यांना शास्त्रांची माहिती देण्यात येत होती.
सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलीत करत शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदाची ज्योत आणण्यासाठी महिलांनी देखील यात सहभाग घेतला होता.




