पुणे शहर

सुतारवाडी पाषाण परिसरात शिवजयंती व जागतिक महिला दिनानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन..

पाषाण : pune city शिवजयंती ( तिथीप्रमाणे ) व जागतिक महिला दिनाचे तसेच फकिरा फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाषाण, सुतरवडी परिसरात तीन दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वराज्य प्रतिष्ठान, शिवसेनेचे महेश भिमराव सुतार, FPAI  व सिम्बॉयसिस हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यामानाने महिला व पुरुष यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मधुमेह चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी गरजूंना मोफत औषधीपचार करण्यात आले. पाषाण, सुतारवाडीतील शेकडो स्त्री पुरुषांनी या शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी शिवजयंती निमित्त मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक व स्रियांना स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना नेत्या रोहिणी धनकुडे, शिवसेना मुळशी तालुका संघटिका ज्योती चांदेरे, उपविभाग प्रमुख दिनेश नाथ, विभाग संघटिका स्वाती रणपिसे, शाखा संघटिका सुनिता रानवडे, शाखा संघटिका धनवंती जाधव, अमोल फाले, सोमनाथ जाधव, नितीन दाभाडे, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सूर्यवंशी, सोनल सुतार, कावेरी सुतार, रुपाली सुतार, आरती जाधव, शांताबाई सुतार, मंगल फाले, जनाबाई सुतार, विमल गव्हाणे, खेडेकर,चंद्रकला सुतार, व इतर सुतारवाडीतील ज्येष्ठ महिलांनी उपस्थिती लावली,

Fb img 1647413731457

महिलांसाठी शिवसेना महिला आघाडी ने आयोजित केलेल्या स्त्री तू घे भरारी या स्पर्धे अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेत महिलांनी उस्फूर्त पणे भाग घेतला. गजानन थरकुडे, रोहिणी धनकुडे व ज्योती चांदेरेनी सुतारवाडीतील महिलांनी स्वबळावर उभे राहून उद्योग उभरावे म्हणून मार्गदर्शन केले. शिवसेनेचे महेश भिमराव सुतार यांनी असेच सामाजिक एकोपा वाढवणारे कार्यक्रम सुतारवाडी व पाषाण परिसरात शिवसेनेकडून घेण्यात येतील असे सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत मोठी घोषणा..
पोलिसाची मदतीसाठी शिवसेना नेत्याकडे धाव

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये