पुणे शहर

महामारीच्या काळात परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा कधीही विसरता न येणारी ; सचिन दांगट

वारजेत सचिन दांगट यांच्या वतीने परिचारिकांचा सन्मान

वारजे :  गेली अनेक वर्ष सेवा परमो धर्म: हे ब्रीदवाक्य घेऊन सेवा करणाऱ्या वारजे माळवाडी परिसरातील  हाॅस्पीटल, क्लिनीक मधील सर्व परिचारिकांचा ” जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधुन भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी  ट्राॅफी , प्रमाणपत्र , बूके देऊन १०० परिचारिकांना त्यांच्या सेवा कार्याबद्दल गौरवण्यात आले. याप्रसंगी सहकार आघाडी खजिनदार सुभाष आगरवाल , अनंत कुलकर्णी , डॉ. मकरंद बोरीकर , डॉ. सुहास सुडोल , डॉ.पारस गंभीर्य , डॉ.जय पवार , व्यंकटेश दांगट , किरण साबळे उपस्थित होते .

गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे काळात या परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा, दिलेला मानसिक आधार कधीही विसरता न येणारा आहे. या सेवाकार्यात काही परिचारकांना तर आपले जीव गमावावे लागले , रोज मृत्युच्या दाढेत जाऊन काम करत असताना त्यांनी चोख कर्तव्य बजावले. त्यांच्या महामारीच्या काळात व रोजच करत असलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

त्यांच्या अतुलनीय सेवेचा सन्मान कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात करणे शक्य झाले नव्हते त्यामुळे आज शतायु हाॅस्पीटल , माई मंगेशकर हॅास्पीटल , कवडे नर्सिंग होम , संजीवन हॅास्पीटल , चैतन्य हॅास्पीटल , बोरीकर हॅास्पीटल यांचेसह वारजे माळवाडी परिसरातील सर्व लहानमोठ्या हॅास्पीटल मधील परिचारिकांचा भारतीय जनता पार्टी पुणे शहर वतीने सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आल्याचे सचिन दांगट यांनी सांगितले.
     

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये