महाराष्ट्र

बृजभूषण सिंहांविरोधात मनसेची तक्रार

मुंबई : भाजप खासदार बृजभूषण सिंहांविरोधात (Brijbhushan Singh) दादर पोलीस (Dadar Police) स्थानकात मनसेनं (MNS) तक्रार दाखल केली आहे. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार दिली आहे. बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल खालच्या भाषेत केलेल्या या वक्तव्यावरून तक्रार देण्यात आली आहे. 

दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत ही तक्रार देण्यात आली आहे. बृजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी तक्रार पाटील यांनी केली आहे. मनसेचे जनहित कक्षाचे वकील ॲड. गजणे , ॲड. रवी पाष्टे , उपविभागाध्यक्ष शशांक नागवेकरसह कार्यकर्त्यांनी दादर पोलीस स्थानाकात जाऊन ही तक्रार दिली. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये