सिनेजगत

सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचं समजतंय. त्याच्या वैयक्तिक सुरक्षेशिवाय पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या ८ हत्येप्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातूनच सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावरून त्यालाही धमकी दिली होती.

Img 20220531 wa00077152469800223841394

‘रेडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने आखला होता. आता गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणात लॉरेन्सचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं आहे. या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी सुरू झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा तोच गुंड आहे ज्याने 2018 मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत ही टोळी पुन्हा सक्रीय होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही त्याची सुरक्षा खूप वाढवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्राथमिक तपासानंतर असं बोललं जात आहे की सिद्धू मूसेवालाचा मृत्यूही गँगवारमुळे झाला असून तिहार जेलपासून कॅनडापर्यंत त्याचं कनेक्शन जोडलं गेलंय. तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने या हत्येचा कट रचला होता आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने तो अंमलात आणला होता. निःशस्त्र आणि बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडलेल्या सिद्धूवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये