सिनेजगत

KK यांच्या निधनाने क्रिकेटपटूही हळहळले


मुंबई : सुप्रसिद्ध गायक केके यांचं कोलकाता येथे निधन झालं. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटत होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने केके यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने फक्त संगीत विश्वावरच नव्हे, क्रीडा विश्वावरही शोककळा पसरली आहे.

Img 20220531 wa00077152469800223841394

आपल्या जादुई आवाजाने केके यांनी रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. क्रिकेट विश्वही याला अपवाद नाही. केके यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटूही शोकसागरात बुडाले आहेत. त्यांनी आपआपल्या पद्धतीने केके यांना श्रद्धांजली वाहिली. अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, वीवी एस लक्ष्मण आणि सुनील जोशी असे दिग्गज क्रिकेपटू केकेच्या गाण्यांचे चाहते होते. केकेच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

केके 53 वर्षांचे होते. लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.केके यांनी 90 च्या दशकात अनेक गाजलेली गाणी गायली. त्यांची गाणी थेट हृदयाला भिडायची. त्यांच्या आवाजात एक जादू होती. त्यामुळेच सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळ स्थान होतं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेक जण हळहळले. केके यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. भारतीय क्रिकेटपटूंनाही त्यांनी आपल्या सूरांनी मोहित केलं होतं. अनेक क्रिकेटपटूंबरोबर केके यांची चांगली मैत्री होती.भारतीय क्रिकेटपटूंमध्ये केके यांची एक वेगळी फॉलोइंग होती.

भारताचे प्रसिद्ध लेग ब्रेक गोलंदाज अनिल कुंबळे यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे, असे अनिल कुंबळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. केके यांचं निधन हे मोठं नुकसान असल्याचे वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. केके यांच्या निधनामुळे आयुष्य किती अनिश्चित आहे, हे दिसून आलं. माझी संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहे. ओम शांती, असं सेहवागने म्हटलं आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये