राष्ट्रीय

जनतेचे लक्ष समस्यांपासून दुसरीकडे वेधण्याची कला मोदींना साध्य : राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची कला साध्य केली आहे. सध्या बेरोजगारीने सार्वकालीक उच्चांक गाठला आहे, घाऊक किंमत निर्देशांकाने (डब्ल्यूपीआय) उच्चांकी पातळी गाठली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) १७ अब्ज डॉलरचे अवमूल्यन यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही, असे राहुल यांनी नमूद केले. ‘ट्वीट’द्वारे त्यांनी ही टीका केली आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे ७८ रुपयांपर्यंत अवमूल्यन झाले आहे. ‘डीएचएफएल’प्रकरण सर्वात मोठी बँक फसवणूक आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिक अशा समस्यांशी झुंजत असताना मोदी मात्र त्यांचे लक्ष अन्यत्र वळवण्याच्या प्रयत्नांत व्यस्त आहेत. पंतप्रधानांचे हे कौशल्य मूळ समस्या-संकटे लपवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही राहुल गांधींनी केंद्राकडे केली आहे.

Img 20220610 wa0330

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये