महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटाचे ‘मनसे’त विलीनीकरण?

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दोनवेळा फोन केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे गटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मनसेकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Img 20220610 wa0330

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे उपस्थित आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या नेत्यांना काय निर्देश देतात, हे पाहावे लागेल. तत्पूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे यांना दोनवेळा फोन केला होता. या दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे गटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मनसेकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. 

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये