अग्निपथ योजनेच्या विरोधात पुणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

पुणे : pune city अग्निपथ योजनेच्या विरोधात पुणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. अनेक नागरिकांनी, तरुण तरुणींनी या योजनेला विरोध दर्शवण्यासाठी स्वाक्षरी करत मोहिमेत सहभाग नोंदवला.
या योजनेच्या माध्यमातून सैनिकांना फक्त चार वर्षे कंत्राटी पद्धतीने देश सेवा बजावता येणार आहे. या चार वर्षानंतर काय करायचं? हा प्रश्न युवकांना भेडसावणार आहे. चार वर्षांनंतर ना रोजगार मिळेल ना पेन्शन त्यामुळे या योजनेला विरोध दर्शवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेऊन तरुणांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, पुणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष भूषण रानभरे, कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव, अभिजित हळदेकर, प्रफुल्ल पिसाळ, प्रसन्न मोरे, संदेश टेंभुरने, निहाल शेख, प्रथम परीट, अविनाश सोळुंके, महेश कांबळे, प्रेरणा गायकवाड, सोहेल लांडगे, आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.







