महाराष्ट्र

एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आज सायंकाळीं ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती भाजाप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार अस्तित्वात येणार

फडणवीस म्हणाले, आज सायंकाळी साडेसात वाजता नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल. नंतर बाकी मंत्र्यांचा शपथविधी होईल. मी सरकार च्या बाहेर असेन पण सरकार सोबत असणार आहे.

देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, “गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली.”

Img 20220629 wa0082
Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये