क्रीडा

पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन..

पुणे : पुणे शहर कराटे असोसिएशन व युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या मान्यतेने पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने दुसऱ्या भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन काँग्रेस भवन शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये ३५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक यशराज स्पोर्ट्स क्लबचे नितिन वैरागर देहूरोड यांनी पटकावले तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक युनिव्हर्सल स्पोर्ट्स स्कूल पुणेचे नितीन शेटे यांनी मिळवले. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक युनिव्हर्सल मार्शल आर्ट उत्तेकर यांना मिळाले.

या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ व कोथरूड विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष विजय खळदकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन व नियोजन कोथरूड युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित ढोकळे यांनी केले होते.

Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये