वारजे येथे निर्मला सीतारामन यांच्या उपस्थित संघटनात्मक कोअर समितीची बैठक

पुणे : वारजे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थित बारामती लोकसभा मतदार संघाच्या संघटनात्मक कोअर समितीची बैठक पार पडली असून या बैठकीत सीताराम यांनी कोअर कमिटीतील सदस्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्या सध्या मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. मतदार संघातील विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आज पार पडले.
वारजे येथील कोअर कमिटीच्या बैठकीत आमदार भिमराव तापकीर व माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी सीतारामन यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या झेंड्याला छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा समर्पित केली आहे, याचेच स्वरुप म्हणून राजमुद्रा व जिरेटोप याचे सन्मानचिन्ह देऊन निर्मलाजी सीतारामन यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या प्रसंगी कोअर कमिटीतील सदस्य उपस्थित होते.
