क्रीडा

पुण्यातील स्वरांजली गमरेला पॉवर लिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

पुणे : पवई, मुंबई येथे WRPF इंडिया आणि महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्वरांजली स्वप्निल गमरे हिने रौप्यपदक मिळविले.

Img 20260222 wa00063491038201882637992

४३ किलो वजनी गटातील डेडलिफ्ट प्रकारात स्वरांजलीने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे रौप्यपदक पटकावले. स्वरांजली ही सध्या येरवडा येथील डॉन बॉस्को हायस्कूल मध्ये सातव्या इयत्तेमध्ये शिकते. प्रशिक्षक सचिन थोरात यांचे तिला मार्गदर्शन लाभले. नागपूरचाळ येरवडा येथील स्वरांजली गमरे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तिच्या क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Img 20260721 wa00053171046657369831221
पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविल्याबद्दल स्वरांजली गमरे हिचे अभिनंदन करताना प्रशिक्षक सचिन थोरात

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये