पुणे शहर

दिवा प्रतिष्ठान आणि हर्षवर्धन मानकर यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी सरंजाम भेट

पुणे :दिवा प्रतिष्ठान आणि हर्षवर्धन मानकर यांच्याकडून पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून महिलांना साड्या व सरंजाम पुरुषांना ड्रेस व सरंजाम देण्यात आला.

त्यावेळेस बेडेकर गणपती कोठीवरील व मोरे विद्यालय हनुमान नगर कोठी वरील महिला व पुरुष सफाई कर्मचारी तसेच आरोग्य निरीक्षक नवनाथ मोकाशी ,हर्षवर्धन मानकर, नवनाथ खिलारे, कांता नवनाथ खिलारे,आशिष शिंदे, लखन सौदागर बाळासाहेब पिसाळ संजय भगत अरुण भिलारे रोहिदास जोरी धनंजय पायगुडे दिलीप कानडे मुकादम गजानन कांबळे व सुरेश शिंदे उपस्थित होते.

हर्षवर्धन मानकर म्हणाले, वर्षभर सफाई कर्मचारी समाजाची सेवा करीत असतात. त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवितो. या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज कोठी रामबाग कॉलनी, सुतारदरा कोठी मधील सर्व आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना महिला व पुरुष यांना कपडे व सरंजाम भेट देण्यात आली यावेळी निलेश शिंदे, नवनाथ खिलारे,कांता खिलारे, आशिष शिंदे,लखन सौदागर बाळासाहेब पिसाळ, अरुण भिलारे, संजय भगत, रोहिदास जोरी, दिलीप कानडे, मुकादम संजय भोसले हे उपस्थित होते.

Img 20221012 192956 045
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये