पुणे शहर

कोथरूडमध्ये ‘वेध भविष्याचा – विचार राष्ट्रवादीचा’ शिबिरात विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन..

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वेध भविष्याचा – विचार राष्ट्रवादीचा या एकदिवसीय शिबिरात मान्यवर वक्त्यांनी कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग नोंदवला.

या शिबिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा –पक्षाची संघटनात्मक रचना व बांधणी, विविध फ्रंटल व सेलचे संघटन रचना व बांधणी या विषयावर जेष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक जडण घडण – छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व समाजसुधारकांची सर्वसमावेशक विचारधारा, मा. पवार साहेबांची योगदान या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मार्गदर्शन केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुर्वतयारी या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर प्रचंड वाढलेली महागाई (गॅस,पेट्रोल,डिझेल,शेतकऱ्यांचा शेतीमालाला भाव न मिळणे) बेरोजगारी – महाराष्ट्रातून परराज्यात गेलेले प्रकल्प आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, नोटबंदी नंतर आर्थिक व्यवस्थेवर झालेले दुष्परिणाम व सर्वसामान्यांच्या जीवनावर झालेले विपरीत परिणाम या बाबत जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी मार्गदर्शन केले. नागरीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न व अडचणी या विषयावर जेष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या शिबिरात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांच्या पक्षीय विचारांना बळकटी मिळाली असून पक्षाच्या धोरणांवर मंथन झाले, तसेच सद्य परिस्थितीवर सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर कार्यकर्त्यांच्या ज्ञानात भर पडली. यामुळे पक्षाचा विचार, धोरण पुढे घेऊन जाण्यास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मदत मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले.

Img 20221126 wa0212847205965836399706

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये