पुणे शहर

बावधनमध्ये आपच्या अ‍ॅक्युप्रेशर शिबिराची सांगता तर नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन

पुणे : आम आदमी पार्टीच्या वतीने बावधनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय मोफत अ‍ॅक्युप्रेशर शिबीरची आज सांगता झाली आणि त्याच बरोबर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन झाले. अ‍ॅक्युप्रेशर शिबीरला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे आयोजन आरती करंजावणे, ज्योती ताकवले आणि कृणाल घारे यांनी केले होते. कार्यक्रमाला “आप” चे प्रदेश संयोजक विजय कुंभार व अजय मुनोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देणे हे आम आदमी पार्टीच्या अशी शिबिरे घेण्यामागचे धोरण असल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले. या वेळी कार्यक्रमाचे संचालक आबासाहेब कांबळे आणि सुदर्शन जगदाळे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांशी सांवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.

१० दिवसीय अ‍ॅक्युप्रेशर शिबिराचा फायदा १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला.आज उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांचे अनुभव व्यक्त करून असे कार्यक्रम नियमितपणे घेण्याची मागणी केली. कार्यक्रमास आम आदमी पक्षाचेचे अमोल काळे, महादेव काळे, शेखर ढगे, ह्रिषीकेश करणे उपस्थित होते.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये