महाराष्ट्र

“…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील” : नारायण राणे

मुंबई : “संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील,” असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे.”

“तेव्हा संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उध्दव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलाने मारलं नाही, तर मला विचारा,” असं राणे यांनी म्हटलं.

राऊतांनी शिवसेना संपवली

“राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा.असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका,” असंही राणेंनी नमूद केलं. नारायण राणे म्हणाले, “राम कदम तीन हजार लोकांना काशी आणि सारनाथला घेऊन चालले आहेत. हे पवित्र कार्य आहे. अशावेळी माध्यमं संजय राऊतांविषयी बोलत आहेत. मात्र, रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम आहे.”

उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम

“मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही,” असं म्हणत राणेंनी राऊतांना टोला लगावला.

Img 20221228 wa0001281294303512961784024189
कल्चरल सेंटर ठरणार वारजेची वेगळी ओळख

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये