पुणे शहर

काँग्रेसचे अखेर ठरले कसब्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर

पुणे: कसबा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असून काँग्रेसच्या वतीने या मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर विरुद्ध भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.

रविंद्र धंगेकर हे रविवार पेठ, कसबा पेठ परिसरातून सातत्याने 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच दोन वेळा शिवसेना, दोन वेळा मनसे आणि एकवेळ काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून कसबा विधानसभा लढताना त्यांनी भाजपचे तगडे नेते गिरीष बापट यांना मोठे आव्हान दिले होते. अवघ्या 7 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. 2014 च्या निवडणुकीत ही त्यांना लक्षणीय मते मिळाली होती.

Fb img 1647413711531 1

कसब्यातून महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली तर रंगतदार लढत होऊ शकते अशी चर्चा पोट निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात आहे. रवींद्र धंगेकर यांचा तळागाळापर्यंत संपर्क असल्याने मतदार संघावर पकड आहे. तर रासने यांचाही मतदार संघात संपर्क दांडगा आहे, त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. या लढतीत बाजी कोण मारणार हे पाहणे उत्सुकता लागून राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये