‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ जाहीर झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सत्कार

पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ जाहीर झाल्याने त्यांचा भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष सचिन फोलाने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग व्हावा यासाठी डॉ.राजेश देशमुख यांनी विविध क्लृप्त्या लढवून दिव्यांग बांधव, तृतीयपंथी तसेच देहविक्री व्यवसायातील मतदारांना देखील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. विविध प्रकारचे कार्यक्रम व शिबिरे आयोजित करून, उत्कृष्ट कल्पनांचा वापर करून निवडणुकीत सर्व घटकांतील मतदारांचा सहभाग वाढवल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
फोलने यांनी सांगितले की, डॉ.राजेश देशमुख साहेब हे मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश डोंगरे, बाळाप्रसाद तापडिया उपस्थित होते.




