राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोथरूडमध्ये आनंदोत्सव साजरा

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.नागरिकांना पेढे वाटून,फटाके आणि हलगी वाजवून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान राज्यपालांनी केला होता. खरतर तात्काळ त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं होतं पण नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात असे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले..
या वेळी शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे,कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर,मनोज पाचपुते,ज्योती सूर्यवंशी,समीर उत्तरकर, स्वप्नील जोशी,रोहन पायगुडे,केतन ओरसे,अमोल गायकवाड,अमित खाणेकर,शेखर तांबे,मधुकर भगत, अजू शेख,आरव दिघे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




