महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, हे आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल …

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. कोश्यारी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिले. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

कोण आहेत रमेश बैस
रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला.

1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. 

1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.

रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. 

छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते.

रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे.

Img 20221228 wa000128129390617609791042356

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये