पुणे शहर

मालवाहू ट्रक ला अपघात; जखमी अवस्थेतील दोघांची अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे: बाणेर येथील मुंबई-बंगळूर महामार्ग, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर ता.५ , सकाळी ६.३० च्या दरम्यान दोन मालवाहू ट्रकचा अपघात होऊन, दोन व्यक्ती जखमी अवस्थेत अडकलल्या होत्या.या जखमींची सुटका अग्निशमन दलाकडून करून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाणेर येथील मुंबई- बंगलुर महामार्ग, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर ता.५ , सकाळी ६.३० च्या दरम्यान रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणाऱ्या मार्गावर मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वाहनचालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी झाले.

त्याचवेळी दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा (बोल्ड कटर, स्पेडर, डोअर ब्रेकर, कटावणी,रश्शी इत्यादी) वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन ही जखमींना बाहेर काढून तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दत्तू आंबू गोळे ,(वय ६०) व सुरज सुर्वे,(वय ३० )अशी यांची नावे असून हे सातारा भागातील रहिवाशी असल्याची माहिती

या कामगिरीतील अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी दिली. यावेळी वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान औंकार देशमुख, विकास कुटे यांनी सहभाग घेतला.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये