राष्ट्रीय

पाकिस्तानची निर्मिती चूकच, हिंदू राष्ट्रावरही बोलले जावेद अख्तर

नवी दिल्ली : “माणसाने केलेल्या १० सर्वात मोठ्या चुका, या नावाने एक पुस्तक लिहिलं गेलं, तर त्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती असेल. धर्म कधीच देश बनवत नाही. धर्म एवढा सशक्त नाही की तो देश बनवू शकेल. तुम्ही एका धर्मावर आधारित देश बनवण्याचा विचार केलात, तर ते कांद्यावरील सालीसारखं आहे. तुम्ही एक काढाल तर दुसरी असेल. तुम्हाला खरा कांदा शोधण्यासाठी साली काढत राहावं लागेल,” असं स्पष्ट मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.

“सध्याच्या पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लीम नाहीत, शिया मुस्लीमही नाहीत. फाळणी झाली, तेव्हा हे सगळे मुस्लीम होते, पण आता नाहीत. हळूहळू या सर्व गोष्टी दूर होत आहेत, नाहिशा होत आहेत. आता आपणही तीच चूक करण्याच्या मार्गावर आहोत, जी त्यांनी ७० वर्षांपूर्वी त्यांनी केली होती”, असं जावेद अख्तर हिंदू राष्ट्राचा उल्लेख करत म्हणाले. लाहोर येथे जाऊन मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावलेल्या संगीतकार जावेद अख्तर यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर मत मांडले.

…तर धर्मावर आधारित देश असते

पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन त्यांना दहशतवादावरून सुनावल्याने भारतीयांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांना पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मला वाटतं की माणसाने केलेल्या १० सर्वात मोठ्या चुका, या नावाने एक पुस्तक लिहिलं गेलं, तर त्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती असेल. पाकिस्तानची निर्मिती अतार्किक, कारण नसलेली होती. आता जे झालंय ते सत्य आपण स्वीकारायलाच हवं. मात्र, जे झालं ते बरोबर नव्हतं. धर्म कधीच देश बनवत नाही. धर्म एवढा सशक्त नाही की तो देश बनवू शकेल. असं असतं तर इटली आणि युरोप धर्मावर आधारित देश असते. जर तुम्ही एका धर्मावर आधारित देश बनवण्याचा विचार केलात, तर ते कांद्यावरील सालीसारखं आहे. तुम्ही एक काढाल तर दुसरी असेल. तुम्हाला खरा कांदा शोधण्यासाठी साली काढत राहावं लागेल,” असं त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये