पुणे शहर

‘तेरा पॉलिटीकल करियर बरबाद करूंगा’, अशी धमकी देत भाजप नेते गणेश बिडकरांकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी

पुणे : माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर यांना व्हॉटस्ॲप कॉल करून तब्बल 25 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकर यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकऱणी बिडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

30 मार्च 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गणेश बिडकर हे श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना एका नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला.  त्याने हिंदी-मराठी भाषेतून बिडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तुला राजकीय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करून तेरा पॉलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तु चुपचाप 25 लाख रूपये दे, अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आलं.  तुने अगर पैसे नही दिये तो तु देख कैसे खेल शुरू होनेवाला है, असं म्हणत त्यांना शिवीगाळ केली आहे.

यासंदर्भात बिडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकरणाता सखोल तपास पुणे सायबर पोलीस करत आहेत. सध्या असे खंडणी मागण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही धमकीला किंवा खंडणी मागितल्यास घाबरु नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

लाच मागितल्याने सरपंचाने उधळले दोन लाख रुपये
पहा व्हिडिओ…
Screenshot 2023 03 21 09 47 53 18
Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये