अर्थजगत

1 एप्रिलपासून महाग होणार या वस्तू, आताच खरेदी करा

पुणे : नव्या आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. हे नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याबरोबरच अनेक बदलही होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे महागाईचा फटका बसणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवरील महागाईचे ओझे वाढणार आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबरच, अनेक गोष्टी महाग होतील. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडेल. खरे तर, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवर टॅक्‍स वाढविण्यात आल्याने त्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून याची अंमलबजावणी होईल.

एलपीजी स‍िलिंडर –

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीची समीक्षा केली जाते अथवा आढावा घेतला जातो. या 1 एप्रिलला पेट्रोलियम कंपन्या किंमती वाढवू शकतात. यापूर्वी 1 मार्चला कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. यावेळीही तेल कंपन्या सिलिंडरचे दर वाढवण्याची शक्यता आहे. 

Screenshot 2023 03 21 09 24 58 44

कारच्या किंमती

जर आपण कार घेण्याचा विचार करत असाल तर, 1 एप्रिलपासून तीही महाग होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प आणि मारुती या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील. कंपन्यांकडून मॉडेलनुसार, किंमती वाढविल्या जाणार आहेत.

काय स्वस्त होऊ शकते

1 एप्रिल 2023 पासून अनेक गोष्टींवरील कस्‍टम ड्यूटी 5 टक्क्यांपर्यंत कमी करून 2.5 टक्के करण्यात आली आहे. यामुळे संबंधित वस्तूंच्या किंमतीत घसरण होईल. या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधित वस्तू, इलेक्ट्रिक कार, खेळणी, हिट कॉईल, डायमंड ज्‍वेलरी, बायोगॅसशी संबंधित काही गोष्टी, सायक‍ल आदी गोष्टींचा समावेश आहे.

याशिवाय, 1 एप्रिलपासून सोने-चांदी आणि यांपासून तयार होणाऱ्या ज्‍वैलरी, प्लॅटिनम, इंपोर्टेड दरवाजे, किचनमधील चिमनी, परदेशी खेळणी, सिगारेट आणि एक्‍स-रे मशीन या वस्तू स्वस्त होतील. या वस्तूंवरील टॅक्स कमी करण्याची घोषणा 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Screenshot 2023 03 21 09 34 12 55

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये