महाराष्ट्र

आदिवासी समाजातील पुजारी असणारे मंदिर; गुजरातमधील भाविकही येतात दर्शनला

पुणे : आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय आपली कुलस्वामीनी मानतो त्या पालघर जिल्ह्यातील विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी देवीच्या (Mahalaxmi Devi) यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे. आदिवासींबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय या देवीला आपली कुलस्वामीनी मानतो. या महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राज घराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो.

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होतात . यात्रे दरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो.

मध्यरात्री ध्वजारोहणाची परंपरा

चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज, पुजेचे साहित्य नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो. तीन वाजता तो डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. ध्वज लावण्यास जातो व सकाळी 7 वाजता परत येतो. हे पाहण्यासाठी हजारो भाविक मार्गात बसलेले असतात.

ध्वज लावण्याचे ठिकाण डोंगरावरील देवीच्या पूजेच्या स्थानापासून सहाशे फुट उंचीवर आहे. ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो दर पाच वर्षांनी बदलला जातो. ध्वज लावण्याचे हे देवकार्य वाघाडी येथील मोरेश्वर सातवी परंपरेने करतात. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटुंबातील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये