वारजेत ६२५० देशी वृक्षांच्या लागवडीला उत्साहात सुरुवात..

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे आयोजन
वारजे : वारजे परिसरात आज ६२५० देशी वृक्षांच्या लागवडीचा शुभारंभ मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ईशाननगरी हनुमान मंदिरासमोरील वन विभागाच्या टेकडीवर या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच स्मिता पाटील शाळेतील विद्यार्थी, मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. पडणारा पाऊस, आल्हाददायक वातावरण आणि देशी वृक्षांची लागवडीला सुरुवात त्यामुळे चैतन्यदायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ माजी नगरसेविका सायली वांजळे , मानसी नलावडे, प्रभावती कानगुडे, वैष्णू सरगर, महादेव गायकवाड, दिपक चादगुडे , डी के जोशी, नंदकुमार बोधाई, सुरेश जाधव, सुरेश काळे, चंद्रकांत चौधरी, दिलीप सातपुते, संतोष वऱ्हाडे, शिवाजी भोईने, पांडुरंग पाटील, राजू धोत्रे, स्मिता पाटील शाळेचे मुख्याध्यापक तनपुरे सर, अरूण पाटील, मनिष धुमाळ, सुनिल वावीकर, विष्णू कुंभार व अनेक नागरिक उपस्थित होते.
या एक महिन्याभरात वन खात्याच्या १० हेक्टर जागेवर ६२५० देशी झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये वनविभाग, पूणे मनपा तसेच स्थानिक नागरीक सोसायटीचे सभासद व स्वयंसेवी संस्था असे अनेक जण सहभागी होणार आहेत. त्याची आज सुरुवात झाली आहे. या लावण्यात येणाऱ्या झाडांसाठी खड्डे तयार करण्यात आले असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे धुमाळ दांपत्य
पर्यावरण रक्षणासाठी व वारजे माळवाडी परिसराला शुद्ध हवा मिळावी यासाठी दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ सातत्याने काम करत आहेत. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांमुळे वारजे परिसरातील टेकड्या हिरव्यागार झाल्या आहेत, त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यामुळे डुक्कर खिंडीतील वनविभागाच्या ३५ एकर जागेवर संजीवन उद्यान या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे संजीवन उद्यान वारजे माळवाडी, कोथरूड, कर्वेनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरणार आहे.
















