पुणे शहर

पुण्यातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा बंद राहणार;खडकवासला जॅकवेल(पर्वती ५०० एमएलडी) येथे तांत्रिक बिघाड, दुरुस्ती सुरू

पुणे: आज शनिवार दिनांक २९/०६/२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता खडकवासला जॅकवेल (पर्वती ५०० एमएलडी) या ठिकाणी विद्युत पुरवठयासाठी असलेल्या २२ के व्ही पॅनेल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पंपींग बंद होउन शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून सायंकाळी ६ पर्यंत ताप्तुरती व्यवस्था करुन पंपींग यंत्रणा चालू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्ग व मुक्कामाचे भागातील पाणीपुरवठा पुर्णपणे सुरळीत ठेवण्यात येणार आहे. तसेच दुरूस्ती कालावधीपर्यंत खालील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


खालील भागातील आज रात्री १२.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठयासाठी बंद राहणार आहे.
पर्वती एच.एल.आर टाकी परिसर :- सहकारनगर, पदमावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, गंगाधाम परिसर इत्यादी.
एसएनडीटी एच.एल.आर टाकी :- गोखलेनगर, कोथरुड परिसर, डहाणूकर कॉलनी, चतुश्रृंगी परिसर इत्यादी.
लष्कर जलकेंद्र:- संपुर्ण हडपसर, रामटेकडी, सोलापुर रोड, कोरेगाव पार्क, महंमदवाडी, रेसकोर्स, कोंढवा परिसर, खराडी परीसर,  येरवडा इत्यादी.
वडगाव जलशुध्दीकरण केंद्राअंतर्गत :- संपुर्ण कात्रज, आंबेगाव, धनवकवडी, केदारेश्वर टाकी
परिसर, सुखसागरनगर इत्यादी.

Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00127754739105663743070
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये