पुणे शहर

अमित शहांच्या पुणे भेटीकडे लक्ष; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची बैठक १४ जुलैला पुण्यात होत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बोलताना सांगितले, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होत असून, राज्यातील साडेचार हजार कार्यकर्ते त्यात सहभागी होणार आहेत. अशा या महत्त्वपूर्ण बैठकीत मार्गदर्शन करावे, अशी विनंती शहा यांना केली. त्यांनी ती मान्य केली.

महायुतीतील कुरबुरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा युतीतील सहभागाबद्दल आक्षेप, भाजपने स्वबळावर लढावे, अशी एका गटाकडून होत असलेली मागणी याबाबतची राजकीय भूमिका अमित शहा बैठकीत स्पष्ट करतील. त्या दृष्टीने बैठक महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. तसेच भाजपकडून उमेदवारीबाबतही काही सूचित केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली, त्याचाही आढावा घेतला जाईल.

Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00127754739105663743070
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये