पुणे शहर

शिवाजीनगर मध्ये महायुतीचे ऐक्याचे शक्तीप्रदर्शन भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : महायुतीतील सर्व पक्षांच्या ऐक्याचे शक्तीप्रदर्शन करत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज आज (सोमवारी) दाखल केला.

शिवाजीनगरचे ग्रामदैवत श्री रोकडोबाचे दर्शन आमदार शिरोळे यांनी घेतले आणि त्यानंतर घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पदयात्रेने जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदयात्रेत महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहभागी झाले होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुती कटिबद्ध असून, मतदारांच्या विश्वासास पात्र ठरेल आणि महायुतीचे पुण्यातील सर्वच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघासाठी आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे सतत पाच वर्षे कार्यरत राहिले. वाड्या-वस्त्यांवरही त्यांनी संपर्क ठेवला, असे मोहोळ यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरोळे यांना शुभेच्छा दिल्या. पद यात्रे मध्ये महायुती तर्फे दिपक मानकर, दत्ता खाडे ,बाळासाहेब बोडके, अभिषेक बोके, संजय डोंगरे, रमेश ठोसर,युवराज शिंगाडे,तम्मा विटकर उपस्थित होते.

Img 20241020 wa0001435697684176070576
Img 20240404 wa0014609723022725136614
Img 20240404 wa0012281298193617916566931378
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये