भाजप युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी बापू चव्हाण यांची निवड..

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी बापू बबन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष करण मिसाळ यांनी त्यांची नियुक्ती केली असून चव्हाण यांना याबाबतचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र,शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष, करण दादा मिसाळ यांनी माझ्यावर विश्र्वास दाखवत माझी निवड केली आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत पक्ष संघटना वाढीसाठी सर्वतोपरी कार्यरत राहिल, असा विश्वास बापू चव्हाण यांनी निवडीनंतर व्यक्त केला.
कोथरूड परिसरात व प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनेक वर्ष सामाजिक काम करत आलो असून त्याची पक्षाने दखल घेतली असून माझ्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडणार असल्याचे बापू चव्हाण यांनी सांगितले.







