
पुणे : अजूनही २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत लागल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केले आहे. बावधन- भुसारी कॉलनी प्रभागातील परिसरात पावसाचे पाणी शिरले होते. स्थानिक नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी महापालिका कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदिप कदम, आपत्ती व्यवस्थापनाचे कनिष्ठ अभियंता येवलेकर, स्वप्निल खोत,उमेश कुऱ्हे तसेच पालिका कर्मचारी वर्गासमवेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरवात देखील केली.

यावेळी बावधन येथील विविध ठिकाणी तुंबलेले ड्रेनेज साफ करणे, बावधन मधील मेन रोडवर डोंगर भागातून वाहून आलेला मैला साफ करून घेत वाहतूक सुरळीत केली. एल.एम.डी. चौक, लक्ष्मी दत्त चौक, हायवेच्या संपूर्ण सर्व्हिस रोडवर तुंबलेले पाणी काढून टाकले. वृंदावन सोसायटी मध्ये साठलेले पाणी उपसा करून काढण्यात आले. उजवी भुसारी काॅलनी मधील विविध सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्याची व डावी भुसारी काॅलनी येथील पडलेल्या सुरक्षा भितीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर उजवी भुसारी लेन नं. २ मधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. कोथरूड डेपो चौक व कलाग्राम सोसायटीच्या तळ मजल्यावरील फ्लॅट व दुकानांमध्ये पाणी शिरले होते तिथे प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्यास सूचना दिल्या तसेच इंदिरा शंकर नगरी येथील घरांमध्ये पाणी शिरले होते.
मेट्रो स्टेशन शेजारील सोसायट्यांमध्ये तसेच समोरील आसावरी सोसायटी च्या पार्कींग मध्ये पाणी साठले. शास्रीनगर शिवांजली मंडळा जवळ, हमराज चौक जवळील मोहोळ चाळ, लाल बहादूर शास्त्री चाळ, सागर काॅलनी, श्रीकृष्ण नगर या वस्ती विभागातील नाल्या लगत असलेल्या अनेक घरात पाणी शिरले व त्यांचे नुकसान झाले. परमहंसनगर येथील नाल्यालगतच्या सोसायटी व बंगल्यांमध्ये देखील पाणी शिरले होते. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन संबधित विभागाच्या अधिकार्यांसमवेत पाहाणी करण्यात आली. व लगेचच उपाययोजना करून कामाला सुरुवात करण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार
नगरसेवक दिलीप वेडे पाटील म्हणाले, अजूनही २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत लागल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. दोन दिवसांपासून संततधार असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभागात विविध ठिकाणी पाणी शिरले होते. त्यासाठी कालपासूनच नागरिकांच्या संपर्कात होतो. जमेल तिथे प्रत्यक्ष जाऊन यंत्रणा राबवण्याचे काम केले.



