एरंडवण्यामध्ये इमारतीवरून पडून कामगार गंभीर जखमी, लोखंडी सळई खांद्यातून आरपार..

अग्निशमन दलाने तत्परता दाखवत वाचविले प्राण; सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर काय कारवाई होणार?
पुणे : एरंडवणा येथील शारदा सेंटर जवळ इमारतीचे बांधकाम सुरु असताना एक कामगार उंचावरुन खड्डयात पडल्याने खांद्यामध्ये सळई आरपार गेली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत शिडी व हायड्रोलिक किटचा वापर करीत त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले.
बुधवारी दुपारी साडे तीन वाजता एरंडवणा येथील शारदा सेंटर जवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक कामगार सुमारे वीस फूट उंचीवरून खोल खड्ड्यात पडला. यावेळी खड्ड्यामध्ये बांधकाम साहित्या मधील लोखंडी सळई त्या कामगाराच्या खांद्या मधून आरपार गेली होती. यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी शिडी व हायड्रोलिक किटचा वापर करीत त्याला बाहेर काढले. मात्र सळई आरपार गेल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांनी आणि डॉक्टरांच्या पथकाने जागेवरच ही हि सळई कापून त्या कामगाराला
तातडीने जवळील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या इमारतीचे बांधकाम सुरू असताना सुरक्षा विषयी घेण्यात येणाऱ्या उपाययोजना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने केल्या नसल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत असून याठिकाणी सुरक्षेसाठी जाळी देखील लावण्यात आली नव्हती. वेळीच सुरक्षा विषयी उपाययोजना केली गेली असती तर हा अपघात टाळता आला असता. या प्रकारा नंतर पोलीस प्रशासन आणि पुणे महापालिका काय कारवाई करणार! असा प्रश्न उपस्थित होत आहे.







