वारजेत रविवार ९ फेब्रुवारी रोजी पार पडणार दुसरे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन ; अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन तर चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती…

संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाबा धुमाळ यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.
वारजे : पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती, साहित्यिक कट्टा वारजे हा पुणे शहरात सर्वात जास्त सक्रिय असणारा साहित्य कट्टा म्हणून नावाजला गेला आहे. वारजे परिसरातील नागरिकांची साहित्यिक भूक भागवली जावी, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं म्हणून माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी पाठपुरावा करून हा साहित्य कट्टा सुरू केला. याच साहित्य कट्ट्याच्या माध्यमातून वारजे परिसरात दुसरं एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामुळे वारजेत दुसऱ्यांदा साहित्यिकांची मांदियाळी भरणार आहे. Literary fair will be held in Warje for the first time; A one-day literature meet on behalf of Literary Katta Warje
पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजेच्या आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मराठी साहित्य संमेलना विषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले की, वारजेत होणारे दुसरे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत बाएफ संस्थेच्या डॉ. मणीभाई देसाई सभागृहात पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी संमेलन अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत.

बाबा धुमाळ यांनी सांगितले की, दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रम होणार असून सकाळी ९.३० वाजता बाएफ संस्था मुख्य प्रवेशद्वार ते सभागृह अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. शिवचरित्रकार ह.भ. प धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होणार आहे.
सकाळी १० वाजता चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार रुपेश पवार यांच्या हस्ते होणार आहे. १०.३० वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यावेळी संमेलन अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत. यावेळी उद्योजक संजय भोर यांना उद्योग रत्न पुरस्कार, साहित्यिक राजीव तांबे यांना साहित्यरत्न पुरस्कार तर सतीश बोडके यांना समाजरत्न पुरस्कार देऊन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
व्याख्यान व प्रकट मुलाखत
दुपारी १ ते २ या वेळेत मातृभाषा व मनशांती या विषयावर डॉक्टर संजय उपाध्ये यांचे व्याख्यान होणार आहे. तर दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे हे ही मुलाखत घेणार आहेत.
परिसंवाद
दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत अभिजात मराठी भाषे समोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. मंगला गोडबोले, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मिलिंद जोशी व संजय आवटे सहभागी होणार आहेत.
मान्यवरांचे कवी संमेलन
सायंकाळी ६ ते ७ या दरम्यान मान्यवरांचे कवी संमेलन पार पडणार आहे. यामध्ये म. भा. चव्हाण हे कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. तर ज्योत्स्ना चांदगुडे, संदीप अवचट, दिगंबर जोशी, स्वाती यादव, वैशाली माळी, ऋचा कर्वे, मंदार खरे, योगेश काळे, उमा व्यास, स्मिता जोहरे जोशी, अशोक शहा, नंदकुमार बोधाई, साधना कुलकर्णी, मृणालीनी कानिटकर, राजेंद्र वाघ, किसन म्हसे आदी कवी सहभागी होणार असून या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर धर्माधिकारी करणार आहेत.
सांजधारा
सायंकाळी ७ ते ९ या वेळेत स्वरसंगेत वारजे प्रस्तुत सांज धारा सुमधुर मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे संगीता कुलकर्णी अजय दाते दीपक पाटील व सहकारी हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेला डि.के जोशी, शरद जतकर, नंदकिशोर बोधाई, सुरेश जाधव, अशोक शहा, महेश कुलकर्णी, जयंत मोहिते, चंद्रशेखर धर्माधिकारी, महादेव गायकवाड आदी उपस्थित होते.


