पुणे शहर

महिलांच्या सशक्तीकरणासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुण्यात याठिकाणी अर्ज करण्याचे आवाहन..

पुणे : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पिंक ई रिक्षा या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे.

Img 20250508 wa00018046597267745442111

या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन २० टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर १० टक्के आर्थिक भार असणार आहे. या योजनेकरिता पात्र महिलांना रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ २० ते ५० वयोगटातील ३ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांना होणार आहे.

पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडीत जवाहरलाल नेहरु उदयोग केंद्र परीसर, गोल्फ क्लब रोड, डॉ. आंबेडकर चौकाजवळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

(जिमाका वृत्तसेवा)

Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये