राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीतील ही नावं चर्चेत ; पुण्यालाही संधी

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मागच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव येणार अशी चर्चा सुरु होती. पण काही कारणास्तव हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता.
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीतील ही नावं चर्चेत :
शिवसेना
सुनिल शिंदे, माजी आमदार
सचिन अहिर, माजी मंत्री
मिलिंद नार्वेकर, सचिव
राहुल कनाल, युवा सेना
विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ) ना.
भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख ) नाशिक
नितिन बानगुडे पाटील, उपनेते
अर्जुन खोतकर, माजी मंत्री
पुणे शहर : चर्चा सुरु आहे, अद्याप नाव निश्चित नाही
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे
राजू शेट्टी
श्रीराम शेटे
आनंद शिंदे
उत्तमराव जानकर
आदिती नलावडे
शिवाजी गर्जे
काँग्रेस
सचिन सावंत
सत्यजित तांबे
मोहन जोशी
नसीम खान



