पुणे शहर

गौतमी पाटील हिच्या गाडीकडून रिक्षाचालकाचा अपघात प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करा -मंत्री चंद्रकांत पाटील यांचे डीसीपी संभाजी पाटील यांना निर्देश

पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागूनजोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर ना. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.

Img 20250508 wa00011184667503723765598

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये