पुणे शहर

पुणे महापालिका निवडणूक प्रारूप प्रभागरचनेस अंतिम मान्यता..काय व किती बदल ; प्रभागरचनेचे गॅझेट पब्लिकेशन या दिवशी येणार..

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देण्यात आली असून अंतिम प्रभागरचनेचे गॅझेट पब्लिकेशन सोमवारपर्यंत (दि. ६) प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार अंतिम प्रभागरचनेस मान्यता मिळालेली आहे.

Img 20250508 wa00011184667503723765598

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक वाद निर्माण झाले होते, तर ही प्रभाग रचना भाजपच्या फायद्यासाठी करण्यात आल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. प्रारूप प्रभाग रचनेवर ६ हजार हरकती प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी ८२८ नागरिकांनी सुनावणीस हजेरी लावली होती. या  सुनावणीनंतर आता किती प्रभागांमध्ये बदल केले जाणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. 

आलेल्या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. त्याला आयोगाची मान्यता मिळाली असून लवकरच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल आणि पुढील निवडणूक प्रक्रियेला वेग येईल असे मानले जात आहे.

प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर शासनाने सुमारे १४ ते १५ बदल केल्याची चर्चा आहे. यामध्ये ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये सुधारणा, तर ८ ते १० प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल केले गेले आहेत. विशेषतः उपनगरांतील काही प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल केल्याचे बोलले जात आहे. मात्र, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल. पुणे महापालिका निवडणूक चार सदस्यांच्या प्रभागपद्धतीनुसार होणार असून एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये