पुणे शहर, जिल्हा

“आगाज 2025” ला अभुतपूर्व प्रतिसाद ;
सकल दिगंबर जैन समाज पुणे व पिंपरी चिंचवड तर्फे आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रम, मिलन, सामूहिक क्षमावाणी, गौरव समारंभ, भक्ती संध्या व दांडिया आदि कार्यक्रम संपन्न

कोथरुड :  आगाज म्हणजे सुरुवात, शुभारंभ, मंगलाचरण होत आहे. या आरंभ साठी आज पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील 28 दिगंबर जैन मंदिर एकत्र येऊन एकतेचा संदेश देत आहेत. म्हणून हा दिवस आज दिगंबर जैन समाजामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाईल, आगाज ची सुरुवात इतकी भव्य-दिव्य,चांगली व शानदार आहे की याची परीसीमा किती मोठी व व्यापक होणार आहे. असा आशीर्वाद आचार्य श्री 108 गुप्तिनंदी जी महाराज यांनी आपल्या प्रवचनांमध्ये सर्व दिगंबर जैन समाजाला दिला.

सकल दिगंबर जैन समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पुणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच 28 दिगंबर जैन मंदिर व त्यांच्या विश्वस्त कमिटी यांना एकत्र आणणारा हा आगाज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा कार्यक्रम कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स वर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Img 20251006 wa0308759325654203918394

“आगाज” या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी अरविंद जैन, आशिष शहा, शितल दोशी, उदंग शहा, मिलिंद लगडे, अविनाश पाटील, पद्मकुमार अजमेरा, प्रीतम शहा,  आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पुणे शहर मधील 28 दिगंबर जैन मंदिर यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात पहिल्यांदाच एकाच मंचावर करण्यात आले होते. पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील सर्व 28 दिगंबर जैन मंदिरांनी विविध नृत्य व नाटिका चे सादरीकरण झाले.

Img 20251004 wa0000148917864967549286

यामध्ये माणिकबाग जैन मंदिर तर्फे “जैन धर्माचा प्रचार कसा करावा”,  सुसगाव जैन मंदिर तर्फे “जैनम् जयती शासनाम्” या “जैन धर्म व जिन शासनाचा मार्ग”, तर विमाननगर जैन मंदिर तर्फे “मंदिर एक संकल्पना, एक स्वप्न” ह्या नृत्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी एलईडी स्क्रीनवर पुणे शहरातील सर्व दिगंबर जैन मंदिर यांची फोटो सहित माहिती दिगंबर जैन श्रावकांना दाखवण्यात आली.

“आगाज” 2025 या कार्यक्रमांमध्ये दिगंबर जैन मुनि आचार्य 108 गुप्तिनंदी जी महाराज यांचे मंगल सानिध्य व आशीर्वाद या कार्यक्रमासाठी लाभले, यावेळी गुरू महाराजांनी आपल्या प्रवचनामध्ये आगाज म्हणजे शुभारंभ सुरुवात मंगलाचरण आहे आणि यासाठी 28 दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त एकत्र येऊन एकतेचा संदेश देत आहेत म्हणूनच आजचा हा दिवस दिगंबर जैन समाजामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, हीच तर खरी सुरुवात इतकी भव्य-दिव्य, चांगली आणि शानदार आहे की याची परीसीमा किती व्यापक मोठी असेल.

एच.एन.डी. हॉस्टेल व श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे जैन समाजाद्वारे, जैन समाजासाठी बनवले गेले आहे,  एच.एन.डी. हॉस्टेल म्हणजे काही जमिनीचा तुकडा नाही, हे वसतीगृह व जैन मंदिर हे जैन समाजाद्वारे जैन समाजासाठी बनवले गेले आहे आणि ते एका महान दाताराने दान केले असून ते वसतिगृह किंवा मंदिर तोडण्याचा किंवा विकण्याचा कोणालाही अधिकार नाही असे आवर्जून गुरु महाराजांनी या ठिकाणी आवर्जून नमूद केले.

Img 20250508 wa00011184667503723765598

क्षमावाणी बद्दल गुरु महाराज म्हणाले आजचा दिवस आपण सर्वांनी एकत्र राहून पुढे गेले पाहिजे, एक दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, एक दुसऱ्यांच्या साथ दिली पाहिजे, त्यामुळेच आपण सर्वजण जगाला वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे. आजच्या या क्षमावाणीच्या दिवसाला “विश्व मैत्री दिवस” म्हणून गणला जातो. क्षमावाणी पूर्ण जगाला महाविनाशापासून वाचवणार आहे. आदी जैन धर्मांच्या गोष्टींचे गुरु महाराजांनी आपल्या प्रवचनात उल्लेख केला.

यानंतर दिगंबर जैन समाजातील प्रतिभा संपन्न व्यक्तींचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. यानंतर संध्याकाळी विशेष आकर्षण म्हणजे इंडियन आयडॉल फेम शिवम सिंग आणि त्यांच्या आर्केस्ट्रा बँड ची भक्ती संगीत संध्या व दांडिया नाईट चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैष्णवी ग्रुप यांचा प्रथम क्रमांक आला.
तसेच जैन समाजातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच विक्रीचे स्टॉल देखील उभारण्यात आले होते. या स्टॉलला देखील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन स्वप्निल पाटणी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीष जैन, महावीर शहा, सुरेंद्र गांधी, सुकमल जैन,सोनल जैन, ममता जैन, वीरेंद्र शहा, शितल लोहाडे, रितेश जैन, प्रीतम मेहता, महेंद्र गंगवाल, देवेंद्र बाकलीवाल, विनय चुडीवाल, प्रसून गोयल तसेच सर्व दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले. जैन धर्माच्या एकात्मतेचा,  क्षमाशिलतेचा संदेश देण्यासाठी या  ऐतिहासिक सोहळ्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व दिगंबर मंदिरांचे विश्वस्त, सभासद व दिगंबर जैन बांधव सहपरिवार मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये